मोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. देशात मोदींची एक फॅशन आयकॉन अशी ओळख आहेच. पण ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलच्या दौ-यावर असतांनाही त्यांची स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज खास ठरलीय. काय आहे त्यांची स्टाईल.

Updated: Jul 18, 2014, 09:41 AM IST
मोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. देशात मोदींची एक फॅशन आयकॉन अशी ओळख आहेच. पण ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलच्या दौ-यावर असतांनाही त्यांची स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज खास ठरलीय. काय आहे त्यांची स्टाईल.
 
नरेंद्र मोदी ब्रिक्स दौ-यासाठी नवी दिल्लीहून १३ जुलैला रवाना झाले तेव्हाचं... मोदींनी आपला खास कुर्ता परिधान केलाय. कुर्ता ही त्यांची खास ओळख आहे.
नरेंद्र मोदी जर्मनीचं मुख्य शहर बर्लिनला पोहोचलेत. आपल्या खास विमानातून उतरतांना इथं त्यांनी आपल्या कुर्त्यावर हाफ जॅकेटही घातलयं.
 
ब्राझीलला नरेंद्र मोदी पोहोचले तेव्हा त्यांची रुप पालटलं होतं. त्यांनी पूर्ण बाहीचा कुर्ता घातला होता. कुर्त्यावर मोदींनी ग्रे कलरचं जॅकेट घातलयं. नरेंद्र मोदींनी चीनचे पंतप्रधान जिनपिंग यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मोदी कुर्त्याऐवजी बंद गळ्याचा कोट घातला होता. हा होता मोदींचा खास सीईओ अवतार.

ब्रिक्स संमेलनात मोदी सामिल झाले तेव्हा त्यांनी ब्राऊन रंगाचा बंद गळ्याचा कोट घातला होता. ब्रिक्स संमेलनात मोदींनी आपल्या खास स्टाईलनं सगळ्यांनाच प्रभावित केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.