'फेसबुक'वरच्या फोटोमुळे प्रेयसीनं केली फूटबॉलपटूची हत्या

नैरोबी : केनियातील एका विद्यापीठात फूटबॉलपटू असणाऱ्या केल्विन इकात्वा याची हत्या करण्यात आलीय. 

Updated: Mar 24, 2016, 04:22 PM IST
'फेसबुक'वरच्या फोटोमुळे प्रेयसीनं केली फूटबॉलपटूची हत्या title=

नैरोबी : केनियातील एका विद्यापीठात फूटबॉलपटू असणाऱ्या केल्विन इकात्वा याची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे, केल्विनची त्याच्याच १९ वर्षीय गर्लफ्रेंडने हत्या केल्याचं स्पष्ट झालंय... आणि या हत्येमागचं कारण आहे फेसबुकवरचा एक फोटो...

२५ वर्षीय केल्विन विद्यापीठात रेझर नावाने प्रसिद्ध होता. त्याने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून एका दुसऱ्या मुलीसोबत फोटो अपलोड केला होता. यामुळे त्याचा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत वाद झाला. आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पाहून तिला इतका राग आला होता की तिने त्या रागातच केल्विनवर एका धारदार चाकूनं वार केले. 

ही घटना कळताच तिच्या घरमालकाने पोलिसांना फोन केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात ते तिथे पोहोचले. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या केल्विनच्या गळ्यावर चाकूने वार केलेले पोलिसांना आढळले. या घटनेमुळे केनियात एकच खळबळ माजली आहे.