ब्रसेल्स अतिरेकी हल्ल्यानंतर बराक ओबामा डान्समध्ये मशगुल

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डिनर घेण्यात आणि डान्स करण्यात मशगुल असल्याचे पुढे आलेय. यू-ट्यूबवर ओबामांच्या डान्सचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Reuters | Updated: Mar 24, 2016, 04:20 PM IST

ब्यूनस आयर्स : ब्रसेल्स विमानतळ आणि मेट्रो येथे बॉम्ब स्फोट झाल्यानंतर जगाताला हादरा  बसला. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डिनर घेण्यात आणि डान्स करण्यात मशगुल असल्याचे पुढे आलेय. यू-ट्यूबवर ओबामांच्या डान्सचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

लॅटिन अमेरिकन नृत्य करणा-या कलाकारांपैकी महिला कलाकाराने बराक ओबामा यांना नृत्य करण्यासाठी निमंत्रित केले. (छाया - रॉयटर्स)

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मिशेल आणि त्यांच्या दोन कन्या रविवारी हवाना येथे दाखल झाले होते. क्युबन भोजन घेतले. तर ब्रुसेल्सवर मंगळवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ७० मिनिटांत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. यात ३५ जण जखमी झालेत तर ११ जण ठार झालेत.

 

सेल्समध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर ब्रुसेल्सची हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली. परिणामी, अनेक भारतीय प्रवासी तिथे अडकून पडले होते. दरम्यान, ब्रुसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर इन्फोसिसचा कर्मचारी बेपत्ता असल्याचे उजेडात आले आहे.