बीजिंग : आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत वक्तव्य करतांना म्हटलंय, ‘तिसरे महायुद्ध येत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे'.
न्यूयॉर्कमधील इकोनॉमिक क्लबने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, 'तिसरे महायुद्ध येत आहे. पण ही चांगली गोष्ट आहे. हे युद्ध दोन राष्ट्रांमध्ये असणार नाही.' यावेळी त्यांनी इंटरनेट आणि इतर माध्यमांबद्दल भाष्य केले.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपले सामाजिक प्रश्न सोडवू शकतो असा संदेश यावेळी त्यांनी दिला. 'या युद्धाद्वारे आपण विविध विविध आजारांवर, दारिद्य्रावर तसेच हवामानातील बदलावर मात करू शकतो. आणि माझा विश्वास आहे की हेच आपले भविष्य आहे‘ असेही ते पुढे म्हणाले. इ-कॉमर्सच्या माध्यमातून जागतिकीकरण करणे हीच "अलिबाबा‘ची मोहिम असल्याचेही ते म्हणाले.
"हे सारे काही पैशासाठी नाही. तर स्वप्नांसाठी आहे‘ असेही ते पुढे म्हणाले. अलिबाबा ही चीनमधील मोठी इ-कॉमर्स कंपनी आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अमेरिकेतील व्यावसायिकांना सेवा पुरविण्याबाबत मा मागील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते.
अमेरिकेन बाजारपेठेत ऍमेझॉनसारख्या मोठ्या इ-कॉमर्स संस्थांसाठी स्पर्धक बनण्याची "अलिबाबा‘मध्ये मोठी क्षमता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.