सेल्फी पडला महागात, दोन मुलींना दाखल केले रुग्णालयात

दक्षिण रशियातील टॅगनरोग शहरात १५ वर्षीय दोन मुलींना सेल्फी काढणे महागात पडले आहे. मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी काढताना विजेचा उच्च दाबचा झटका बसला. त्यामुळे या दोघींची स्थिती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Reuters | Updated: Jun 10, 2015, 04:37 PM IST
सेल्फी पडला महागात, दोन मुलींना दाखल केले रुग्णालयात title=
संग्रहीत

टॅगनरोग : दक्षिण रशियातील टॅगनरोग शहरात १५ वर्षीय दोन मुलींना सेल्फी काढणे महागात पडले आहे. मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी काढताना विजेचा उच्च दाबचा झटका बसला. त्यामुळे या दोघींची स्थिती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अति उच्च विजेचा जोरदार करंट बसल्याने दोन्ही मुली जखमी झाल्यात. ही घटना सोमवारी घडली. या घटनेचा तपास सुरु आहे.

मे महिन्याच्या मध्यात सेल्फी काढताना १८ वर्षीय तरुणीचा जीव गेला होता. ही तरुणी रोमानियाईची होती. ही तरुणीही रेल्वेच्या टपावर चढून सेल्फी काढत होती. तिला २७ हजार व्होल्टचा करंट बसला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

एका अभ्यासानुसार दिवसातील ५ तास मुली सेल्फी काढण्यासाठी वाया घालवतात. मुली कमीत कमी ४८ मिनीटे ते एक आठवडातील ५ तास ३६ मिनिटे सेल्फी काढण्यात मग्न असतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.