क्रुरकर्मा इसिसनं आता ४० जणांना जाळलं

इराकमधील पश्चिमेकडील अन्बर प्रांतात इसिसनं मंगळवारी कृष्णकृत्यांचा कळस गाठला असून, तेथील ४० जणांना जिवंत जाळण्यात आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलीस प्रमुख कासिम अल ओबैदी यांनी ही माहिती दिली आहे. अल बगदादी या गावात ३० ते ४५ जणांना ठार मारण्यात आलं. मृत लोक अल्बु ओबैद सुन्नी जमातीचे आदिवासी होते. 

Updated: Feb 19, 2015, 09:26 AM IST
क्रुरकर्मा इसिसनं आता ४० जणांना जाळलं title=

बगदाद : इराकमधील पश्चिमेकडील अन्बर प्रांतात इसिसनं मंगळवारी कृष्णकृत्यांचा कळस गाठला असून, तेथील ४० जणांना जिवंत जाळण्यात आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलीस प्रमुख कासिम अल ओबैदी यांनी ही माहिती दिली आहे. अल बगदादी या गावात ३० ते ४५ जणांना ठार मारण्यात आलं. मृत लोक अल्बु ओबैद सुन्नी जमातीचे आदिवासी होते. 

धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांच्या या गटात काही पोलीस आणि सरकारशी निगडीत लोकांचाही समावेश होता, असंही या अधिकाऱ्यानं ‘सिन्हुआ’ला माहिती दिली.
 
आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी सर्व अपह्रत लोकांना जिवंत जाळल्याचं समोर आलं आहे. ज्या ठिकाणी अमेरिकन सैनिकांचं वास्तव्य आहे त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी हे क्रूर कृत्य केलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.