भारतावर टीकेचा विरोध करू शकतो इंडोनेशिया, पाकला झटका

 इस्लामिक सहयोग संघटना (ओआयसी) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या ताशकंद येथे होणाऱ्या बैठकीत इंडोनेशिया भारताच्या बाजूने बोलण्याची शक्यता आहे. पाकिस्तान काश्मिर मुद्द्यावर जर भारतावर टीका करेल तर त्याचा विरोध इंडोनेशिया करू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Updated: Oct 19, 2016, 04:02 PM IST
भारतावर टीकेचा विरोध करू शकतो इंडोनेशिया, पाकला झटका  title=

नवी दिल्ली :  इस्लामिक सहयोग संघटना (ओआयसी) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या ताशकंद येथे होणाऱ्या बैठकीत इंडोनेशिया भारताच्या बाजूने बोलण्याची शक्यता आहे. पाकिस्तान काश्मिर मुद्द्यावर जर भारतावर टीका करेल तर त्याचा विरोध इंडोनेशिया करू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

इंडोनेशियामध्ये मुस्लिम लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठा देश आहे. इंडोनेशिया भारताची निंदा करण्याचा प्रस्तावावर आक्षेप घेऊ शकतो. तसेच काश्मीर मुद्द्यावर कमकुवत भूमिकेवर ओआयसीला प्रेरीत करण्याचा प्रयत्न इंडोनेशिया करणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, इंडोनेशियाने जगभरात वाढत असलेल्या कट्टरवादी ट्रेंड वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. एका व्यक्तीने नाव न जाहीर करण्याचा अटीवर सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून ओआयसीमध्ये काश्मीर मुद्द्यावर खल सुरू आहे.