मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बुधवारी मॉस्कोमध्ये शानदार स्वागत करण्यात आलं. यावेळी, राष्ट्रगीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी चालतच राहिलेले दिसले.
त्याचं झालं असं की पंतप्रधान मोदींना नुको २ विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. यावेळी, सॅल्युट केल्यानंतर एका अधिकाऱ्यानं मोदींना चालण्यासाठी इशारा केला. परंतु, तेवढ्यात भारताचं राष्ट्रगीत सुरू झालं. त्यामुळे, रशियाचे सगळे अधिकारी आपल्या जागेवरच थांबले परंतु, मोदी मात्र चालतच राहताना दिसले...
हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब एका रशियन अधिकाऱ्यांना येऊन मोदींना थांबवलं आणि जाऊन थांबण्यास सांगितलं. त्यानंतर, तो मोदींच्या कानात काही कुजबजला आणि जागेवर थांबला.
उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्या द्विपक्षीय रशिया यात्रेदरम्यान दोन्ही देशांदरम्यान सुरक्षा, अणु ऊर्जा आणि हायड्रोकार्बन यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांसबंधित अनेक चर्चा आणि करार होणार आहेत. यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे.