नवी दिल्ली : जपानमध्ये सध्या एक अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. जपानच्या आमोरी पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर हा रोमांचित करणारा अनुभव प्रवाशांना पाहायला मिळाल्यानं ते थक्क झालेत.
बर्फवृष्टीनंतर या भागात बर्फाच्या अनेक आकृत्या आपोआप तयार झाल्यात. मानव आणि जनावरांच्या या आकृत्या आहेत. पहिल्या नजरेत तर हजारो हिममानव एकत्र उभे राहिल्याचं या आकृत्यांकडे पाहून वाटतं.
इजिप्तमधल्या 'ममी'प्रमाणे या आकृत्या दिसतात. उल्लेखनीय म्हणजे, या आकृत्या बनवण्यात कोणत्याही व्यक्तीचा हात नाही.
बर्फवृष्टीनंतर या आकृत्या आपोआप उभ्या राहिल्यात.