न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका कोर्टाने बेबी प्रोडक्ट बनवणऱ्या 'जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर ३६५ कोटींचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची पावडर वापरल्याने तिच्या गर्भाशयाला कर्करोग झाल्याने एका महिलेने या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती.
'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला कोर्टाकडून आता दुसरा झटका बसला आहे. या कंपनीविरोधात किमान १२०० तक्रारी आहेत.
कंपनीची पावडर वापरल्यामुळे कँसरचं प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. मिसूरी राज्य न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरु होते. ग्लोरिया राइट्संड महिलेला तीन आठवड्यानंतर न्याय मिळाला आहे.
गेल्या ४० वर्षापासून जॉन्सनची चेहऱ्यावर लावणारी पावडर, आणि बरेच प्रोडक्ट ती वापरत होती. २०११ मध्ये त्यांना कँसर असल्याचं अचानक लक्षात आलं. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना अंडाशयात चेहऱ्यावर लावणाऱ्या पावडरचे अंश मिळाले. महिलेच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना १९७० मध्येच समजलं होत की टॅल्कम पावडरने आऱोग्याला नुकसान होऊ शकतं तरी ग्राहकांपासून ही गोष्ट लपवली गेली.
आपल्या उत्पादनांची योग्य ती काळजी घेऊ असं कंपनीने सांगितलं आहे. आश्चर्य म्हणजे याआधी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर ७.२ कोटींचा दंड लागला होता आणि ते प्रकरण सुद्धा गर्भाशयातील कँसरचं होत. यामध्ये ३५ वर्षापासून वापरत आलेल्या टॅल्कम पावडरने जॅकलीन फॉक्स महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर भारतीय कंपनीविरोधात तपास सुरू केला होता.