नवी दिल्ली : भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद हा पाकिस्तानात असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदला जैसलमैर बॉर्डरजवळ संशयितरित्या फिरताना पाहिले गेले आहे.
हापीस सईद या भागातील गावांचा दौरा करतानाची EXCLUSIVE दृश्य झी मीडियाच्या हाती लागलीत. हाफीस सईद जमात-ऊल-दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या आहे. या संघटनेवर अमेरिकेनंही बंदी टाकली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील खैरपुर मिठी आणि इस्लामकोट गावांचा हाफीसनं दौरा केला आहे.
सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सईद हा दोन दिवस त्या ठिकाणी थांबला होता. यावेळी सईदने सीमा भागातील लोकांना भारताबद्दल भडकविले आहे. तसेच दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात मुलांना पाठविण्यासाठी दबाब आणला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा सर्तक झाली आहे. दरम्यान, अमेरिकेने सईद हाफिजला जमात-उद-दावा या संघटनेला दशहतवादी संघटना म्हणून घोषीत केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.