www.24taas.com, झी मीडिया,लंडन
मुलं जर मुलींचे कपडे घालून वावरायला लागले तर काय मज्जा येईल ना. होय, तुम्ही बरोबर ऐकलत असचं झालयं ब्रिटनमधील काही शाळांमध्ये. ब्रिटनमधील काही शाळांतील मुलांनी तर अगदी कहरच केला आहे. तिथे विद्यार्थी शाळेमध्ये स्कर्ट घालून जात आहेत. मुलं असं म्हणतायत जर मुली पॅंट तसेच स्कर्ट घालू शकतात तर, मग आम्ही का नाही?
मुलांसाठी काही खास प्रकारचे ड्रेस कोड शाळांमध्ये बनवले असून ते त्याच्या विरोधात आहेत. त्यामुळेच आपला विरोध ते अशाप्रकारे दर्शविताना दिसताहेत. मुलांच्या अशा वागण्यामुळे शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांची कोंडी होताना दिसतेय. मुलींनी स्कर्ट घातलेले चालू शकतात तर, मग मुलांनी शॉर्ट्स का घालू नयेत, असं त्यांचं म्हणण आहे. १७ मुलांनी चक्क शहरात एक रॅलीही काढली.
वेल्सच्या स्वानसीमधील गोवर्टन काम्प्रेहेंसिव शाळेतील मुलांना शाळेत शॉर्ट्स घालून जाण्यास बंदी केली आहे. आताच्या हवामानानुसार ब्रिटनमध्ये फारच उकाडा होत आहे, त्यामुळे मुलांना पूर्ण कपडे घालून शाळेत जाणं त्यांना कठिण झालंय. पण, तेथेच मुली मात्र स्कर्ट तसेच टाऊझर घालून शाळेत येतात. शाळेत मुलांना सैल कपडे घालून जाण्यास असलेली बंदी आणि वाढती गर्मी यामुळेत मुलांनीसुद्धा शाळेत स्कर्ट घालून जाण्यास सुरुवात केलीय. मुलांचे पालकही याच्याशी सहमत असल्याचे दिसून येतंय. त्यांनी म्हटलंय, उकाड्यात दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.