नवी दिल्ली : सऊदी अरबमधील रियाद येथे पोलिसांनी एका तरुणीला ट्विटरवर फोटो टाकल्यामुळे अटक केली आहे. तरुणीने बुरखा नसलेला फोटो ट्विट केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. तरुणीने सऊदी अरबच्या कायद्याविरोधात जाऊन हा फोटो पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर आहे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा न घालता फोटो काढण्यावर येथे बंदी आहे.
रियाद पोलिसांचे प्रवक्ते फवाज अल-मेमन यांनी या तरुणीची कोणतीही माहिती दिली नाही. पण सोशल मीडियावर या तरुणीची ओळख व्हायरल होत आहे. मलाक-अल-शेहरी असं या तरुणीचं नाव असल्याचं म्हटलं जातंय.
तरुणीचं वय २० वर्ष आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की या तरुणीने कायद्याचं उल्लंघन केलं आहे. गैरपुरुषाबाबत सावर्जनिकपणे बोलण्याचा आरोप देखील या तरुणीवर आहे.