www.24taas.com, लंडन
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लेडी एडविना माउंटबेटन हे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. दोघेही जणू ‘शरीरं दोन, पण आत्मा एक’ अशा पातळीवर पोहोचले होते. मात्र त्यांच्यात शारीरिक संबंध नव्हते, असं लेडी माउंटबेटन यांची मुलगी पामेला हिचं म्हणणं आहे. पामेला यांनी आपल्या ‘डॉटर्स ऑफ एम्पायर’मध्ये या संबंधात खुलासा केला आहे.
पुस्तकामध्ये भारतातील अंतिम व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांना आपली पत्नी आणि नेहरू यांच्या संबंधांबद्दल माहिती होती. मात्र त्यांनी कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही. पामेला यांच्यामते नेहरू आणि एडविना हे एकमेकांशिवाय जगू शकणार नाहीत, एवढ्या पातीपर्यंत त्यांचे प्रेमसंबंध पोहोचले होते. मात्र तरीही त्यांच्यात शारीरिक संबंध नव्हते. ते आध्यात्मिक पातळीवर जवळ आले होते.
नेहरू आणि लेडी माउंटबॅटन एकमेकांचा एकटेपणा दूर करण्यासाठी सतत एकत्र येत असत. दोघांमधील संबंध अधिक गहिरे होत गेले होते. पामेला यांनी पुस्तकात अनुभव लिहिताना म्हटलं आहे, की मा झ्या भारतातील वास्तव्यात मी नेहरूंसोबत बराच काळ व्यतित केला होता. माझी आई आणि नेहरू हे एकमेकांकडे आकर्षित झाले होते. दोघेही ‘दोन शरीरं आणि एक आत्मा’ असावा, त्याप्रमाणे होते.