गोल चपाती बनवली नाही म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या

गोल चपाती बनवली नाही म्हणून आपल्या १२ वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीये. लाहोर न्यायालयाने या व्यक्तिला शिक्षेसह ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

Updated: Oct 27, 2016, 01:15 PM IST
गोल चपाती बनवली नाही म्हणून वडिलांकडून मुलीची हत्या title=

लाहोर : गोल चपाती बनवली नाही म्हणून आपल्या १२ वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीये. लाहोर न्यायालयाने या व्यक्तिला शिक्षेसह ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

याप्रकरणी आरोपी वडील खालिद महमूदला अटक करण्यात आलीये. मुलीचा मृतदेह एका रुग्णालयाजवळ आढळले. 

तपासादरम्यान मुलीला केवळ गोल चपाती बनवता आली नाही म्हणून पित्याने हत्या केल्याचे समोर आलेय.पोलिसांनी याप्रकरणी मुलीचा भाऊ अबुजारलाही अटक केलीये.