लग्न आणि मुलांबाबतच्या प्रश्नांवर महिलेचं उत्तर, FB पोस्ट वायरल

20-30 वयोगटातील नवदाम्पत्यांना किंवा अविवाहित तरुण-तरुणींना अनेकांनी हा लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारले असतील. याच प्रश्नांनी थकलेल्या एका महिलेनं 'None of your business'ही पोस्ट फेसबुकवर टाकली. महिलेल्या तिच्या पोस्टबाबत खूप पाठिंबा मिळतोय.

Updated: Sep 29, 2015, 03:07 PM IST
लग्न आणि मुलांबाबतच्या प्रश्नांवर महिलेचं उत्तर, FB पोस्ट वायरल title=

लंडन: 20-30 वयोगटातील नवदाम्पत्यांना किंवा अविवाहित तरुण-तरुणींना अनेकांनी हा लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारले असतील. याच प्रश्नांनी थकलेल्या एका महिलेनं 'None of your business'ही पोस्ट फेसबुकवर टाकली. महिलेल्या तिच्या पोस्टबाबत खूप पाठिंबा मिळतोय.

यूएसए टुडेनं दिलेल्या बातमीनुसार, बाळाच्या अल्ट्रासाउंड फोटोसह एमिली बिंघमने 21 सप्टेंबरला फेसबुकवर एक कमेंट पोस्ट केली. 'एक मित्रत्वाचा सल्ला आहे की, लोकांनी गर्भधारणेच्या योजनांबद्दल आणि निर्णयांबद्दल उगाच सल्ला देऊ नये, त्याच्याशी तुमचा संबंध नाही. म्हणजेच‘None of your business’.
 

एमिलीच्या या पोस्टला फेसबुकवर लोकांचं खूप समर्थन मिळालं आणि रविवारी संध्याकाळपर्यंत तब्बल 36 हजार वेळा ही पोस्ट शेअर झाली होती.

इंग्लंडच्या दोन वर्तमानपत्रांचं या पोस्टवर लक्ष गेलं. त्यानंतर त्यांनी बातमी छापली. 

बिंघमने सांगितलं, "मी आपल्या बॉयफ्रेंडच्या कुटुंबियांसोबत जेवत होती. तेव्हा कुणी माझाकडे बोट करत नातवंडांहून माझी खिल्ली उडवली. हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. मी 33 वर्षांची आहे आणि अविवाहित आहे. मी लोकांच्या अशा अनेक कमेंट्स ऐकल्या आहेत. तुझं वय वाढतंय, तुम्ही मुलांबद्दल काय विचार करताय? या सर्व प्रश्नांनी मी थकली म्हणून हे उत्तर दिलं."

बिंघम पुढे म्हणाली, हा फक्त 20-30 वयोगटातील तरुणींना प्रश्न विचारण्याचा मुद्दा नाहीय. तर या प्रश्नांमुळे समोरच्याला दु:ख होतं याचा विचार कुणी करत नाहीत. तुम्ही मुला-बाळांबद्दल काय विचार केलाय, हा प्रश्न जेव्हा एका नवदाम्पत्याला विचारला जातो. तेव्हा त्याबद्दल त्यांनी काही प्लानिंग केलंय किंवा त्यांना आरोग्याची काही समस्या आहे, याचा विचार न करता हा प्रश्न विचारला जातो. त्याचा परिणाम नक्कीच समोरच्या व्यक्तीच्या मनावर होत असतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.