अमेरिकेत प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार

प्रगत आणि पुढारलेल्या अमेरिकेमध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांवर १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच अत्याचाराला बळी पडल्या आहेत. तर प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार होत असल्याचे पुढे आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 24, 2014, 10:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
प्रगत आणि पुढारलेल्या अमेरिकेमध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक महिलांवर १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच अत्याचाराला बळी पडल्या आहेत. तर प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार होत असल्याचे पुढे आले आहे. यामध्ये २७ टक्के भारतीय वंशाच्या महिला बळी पडल्या आहेत.
मानवाधिकाराबाबत अमेरिकेने जगभर आवाज उठविला आहे. परंतु, खुद्द अमेरिकेमधील महिलाच सुरक्षित नसल्याचे एका अहवालाद्वारे उघड झाले आहे. प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार होत आहे, अशी माहिती व्हाइट हाऊसमधील एका अहवालाद्वारे नुकतीच पुढे आली आहे. व्हाइट हाऊसमधून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशातील विविध भागामधील महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे.
अमेरिकी-भारतीय महिलांवर सर्वाधिक बलात्कार झाले आहेत. दोन कोटी २० अमेरिकन महिला आणि १६ लाख पुरुषांना अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. हा अत्याचार आपल्या नातेवाईक तसेच ओळखींच्यांकडूनच होत असल्याचे पुढे आलेय. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी व्हाइट हाऊसने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आता ओबामा काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.