भारताचं समर्थन करण्याचं जागतिक नेतृत्वाला आवाहन

युरोपियन युनिअनचे उपाध्यक्ष रिचर्ड जारनेकी यांनी सर्जिकल हल्ल्याच्या बाबतीत भारताचं समर्थन करण्याचं आवाहन जागतिक नेतृत्वाला केलंय. हा हल्ला पाकिस्तानवर नसून दहशतवाद्यांवर होता असं भारतानं स्पष्ट केलंय. शिवाय हल्ल्यामुळे दक्षिण आशियात स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जारनेकींच्या मते पाकिस्ताननं त्याच्या सीमेत चालणाऱ्या दहशतवादी कारवायांवर अंकूश आणावा यासाठी संपूर्ण जगातून दबाव वाढवावा लागणार आहे.

Updated: Oct 5, 2016, 11:49 AM IST
भारताचं समर्थन करण्याचं जागतिक नेतृत्वाला आवाहन  title=

नवी दिल्ली : युरोपियन युनिअनचे उपाध्यक्ष रिचर्ड जारनेकी यांनी सर्जिकल हल्ल्याच्या बाबतीत भारताचं समर्थन करण्याचं आवाहन जागतिक नेतृत्वाला केलंय. हा हल्ला पाकिस्तानवर नसून दहशतवाद्यांवर होता असं भारतानं स्पष्ट केलंय. शिवाय हल्ल्यामुळे दक्षिण आशियात स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जारनेकींच्या मते पाकिस्ताननं त्याच्या सीमेत चालणाऱ्या दहशतवादी कारवायांवर अंकूश आणावा यासाठी संपूर्ण जगातून दबाव वाढवावा लागणार आहे.

भारताला आतापर्यंत जगातील इतर अनेक देशांपासून समर्थन मिळालं आहे. आता युरोपियन युनिअनचे उपाध्यक्ष यांनी केलेलं  हे आवाहन निश्चितच मोठं आहे.