मोदींशी हस्तांदोलन केल्यानंतर सत्य नडेला यांचे लाजीरवाणं कृत्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्य दौऱ्यावर होते. यावेळी मोठ मोठ्या कंपन्यांचे सीईओ त्यांच्या भेटीला आले. त्यावेळी सर्वांनी हस्तांदोलन केले. यावेळी मायक्रोसॉफ्ट मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेलाही उपस्थित होते. त्यांनी हस्तांदोलन केल्यानंतर लाजीरवाणी कृत्य केले.

Reuters | Updated: Sep 29, 2015, 05:40 PM IST
मोदींशी हस्तांदोलन केल्यानंतर सत्य नडेला यांचे लाजीरवाणं कृत्य title=

न्यूयॉर्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्य दौऱ्यावर होते. यावेळी मोठ मोठ्या कंपन्यांचे सीईओ त्यांच्या भेटीला आले. त्यावेळी सर्वांनी हस्तांदोलन केले. यावेळी मायक्रोसॉफ्ट मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेलाही उपस्थित होते. त्यांनी हस्तांदोलन केल्यानंतर लाजीरवाणी कृत्य केले.

पंतप्रधान मोदी यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर सत्य नडेला यांनी आपला हात झटकून साफ करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला वारंवार हात साफ करताना दिसत आहेत. हा प्रकार पंतप्रधान मोदी यांचा अपमान दाखवतो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात याविषयी राग उत्पन्न होणे साहजिक आहे.

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.