आईनस्टाईनच्या पत्राचा 62500 डॉलरमध्ये लिलाव

अल्बर्ट आईनस्टाईनने 1945 मध्ये आपल्या मुलाला एक पत्र लिहिलं होतं ज्यात सापेक्षता सिद्धांत आणि अणूबॉम्ब यांतील त्याने सांगितलं होतं. त्या पत्राचा 62,500 डॉलरमध्ये लिलाव झालाय. जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता त्यावेळी आईनस्टाईनने हे पत्र लिहिलं होतं.

Updated: Jun 14, 2015, 03:37 PM IST
आईनस्टाईनच्या पत्राचा 62500 डॉलरमध्ये लिलाव title=

लॉस एंजेलिस : अल्बर्ट आईनस्टाईनने 1945 मध्ये आपल्या मुलाला एक पत्र लिहिलं होतं ज्यात सापेक्षता सिद्धांत आणि अणूबॉम्ब यांतील त्याने सांगितलं होतं. त्या पत्राचा 62,500 डॉलरमध्ये लिलाव झालाय. जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता त्यावेळी आईनस्टाईनने हे पत्र लिहिलं होतं.

 

गुरूवारी 'प्रोफाईल्स इन हिस्टरी'मध्ये आईनस्टाईनच्या 27 पत्रांचा लिलाव झालाय ज्यातून 4,20,000 डॉलर इतकी रक्कम मिळाली आहे. लिलाव झालेल्या पत्रांपैकी 2 पत्र आईनस्टाईनने 1940च्या दशकात लिहिलेली होती. या पत्रांमध्ये त्याने आपले ईश्वराबद्दलचे विचार लिहिले आहेत. या पत्रांचा अनुक्रमे 28,125 आणि 34,375 डॉलरमध्ये लिलाव झालाय. अन्य पत्रांमध्ये त्याने बऱ्याच गोष्टींवर आपली मतं मांडली आहेत.

 

विक्रेत्याने बरीच वर्षे ही पत्रं जमवली असून त्याने आपली ओळखही लपवली आहे. ही पत्रं वेगवेगळ्या लोकांनी खरेदी केली आहेत, अशी माहिती 'प्रोफाईल्स इन हिस्टरी'चे संस्थापक जोसेफ मॅडालेना यांनी दिली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.