मध्य चीनमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

मध्य चीनमध्ये रात्री १२ च्या सुमारास भुकंपाचे धक्के बसले आहेत. जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल होती. भूकंपात जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही.

Updated: Jan 21, 2016, 09:51 AM IST
मध्य चीनमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के title=

बीजिंग : मध्य चीनमध्ये रात्री १२ च्या सुमारास भुकंपाचे धक्के बसले आहेत. जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रॉयटरने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल होती. भूकंपात जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही.

भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये एकच घबराट पसरली आणि गोंधळ निर्माण झाला.  माध्यमांच्या वृत्तानुसार मेनयुआन काउंटीत मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. 

चीनची न्यूज एजेंसी शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील किघाई जवळील मेनयुआन काउंटी मध्ये जमीनीच्या आत १० किलोमीटर खोल भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.