फुटबॉल वर्ल्डकपमुळे गमावला जीव

सतत फुटबॉल वर्ल्डकप बघून एका पंचवीस वर्षांच्या युवकांचा मृत्यू झालाय. रात्रभर जागे राहून मॅच बघणे त्या मुलांच्या जीवावर उलटलंय.

Updated: Jun 18, 2014, 08:16 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, शांघाई
सतत फुटबॉल वर्ल्डकप बघून एका पंचवीस वर्षांच्या युवकांचा मृत्यू झालाय. रात्रभर जागे राहून मॅच बघणे त्या मुलांच्या जीवावर उलटलंय.
न झोपता सतत मॅच बघण्यामुळे त्या मुलांचा मृत्यू झालाय, हे डॉक्टरांनी स्पष्ट केलेयं. मृत्यूच कारण झोप अपूरी झाल्याने झाली असावी, परंतु त्याचा मृत्यू हृदय विकाराच्य झटक्यानं झालाय, की झोप न मिळाल्या कारणांनी आलेल्या थकव्यांनी झालीय हे स्पष्ट झालेलं नाहीय.
माहितीनुसार, स्पेन आणि नेदरलॅड मॅच सुरु असताना या युवकाच्या घरात टीव्ही बघताना मृतदेह सापडला. तसेच ब्राझील आणि चीनच्या स्थानिक वेळेत 11 तासांचा फरक आहे. याच कारणाने फुटबॉल चाहत्यांना रात्रभर जागावे लागतेय.
चीन या विश्वकपसाठी पात्रता फेरी पूर्ण करु शकला नाही, त्यामुळे ब्राझीलमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये चीन खेळत नाहीय. तरी सुध्दा चीनमध्ये फुटबॉलचे करोडो चाहते आहेत.
अशाच काही घटना चीनमध्ये 2006 आणि 2010 वर्ल्डकपमध्ये घडल्या होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.