डोनाल्ड ट्रम्प यांचा उत्तर कोरियाला इशारा

उत्तर कोरिया बरोबर टोकाचा संघर्ष पेटण्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलीय. 

Updated: Apr 28, 2017, 10:24 AM IST
डोनाल्ड ट्रम्प यांचा उत्तर कोरियाला इशारा title=

वॉशिंग्टन : उत्तर कोरिया बरोबर टोकाचा संघर्ष पेटण्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलीय. 

राष्ट्राध्यक्षपद स्वीकारून ट्रम्प यांना १०० दिवस पूर्ण होतायत...त्यानिमित्तानं ट्रम्प यांनी दिलेल्या खास मुलाखातीत हा इशारा दिलाय. 

गेल्या काही दिवसात अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातला संघर्ष टिपेला पोहचलाया...उत्तर कोरियानं अणू हल्ला करण्यास मागे पुढे बघणार नाही, असा इशाराच अमेरिका दिला होता. त्यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिलंय.

सगळ्या समस्या सोडवण्यास चर्चेला प्रथम प्राधन्य देण्यात येईल..पण अमेरिका गप्प राहून सगळं ऐकून घेईल असा समज करून घेऊ नये असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलाय.