नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी जोरात प्रचार सुरु केला आहे. या निवडणूक प्रचारात त्यांनी भारताचा उल्लेख करत बराक ओबामा यांच्यावर टीका केली आहे.
ट्रंप यांनी म्हटलं की, भारतासारख देश जर ८ टक्के विकास दर वाढवू शकतो तर अमेरिका का नाही. डोनाल्ड ट्रंप यांनी धिम्या आर्थिक प्रगतीसाठी ओबामा यांच्यावर टीका केली आहे. मॅनेचेस्टर, न्यू हँपशायरमध्ये झालेल्या निवडणूक रॅलीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे आकडे जाहीर झाले आहेत. ज्यामध्ये 2.9 टक्के अमेरिकेचा विकास दर असल्याचं समोर आलं आहे. ट्रंप यांनी म्हटलं की, ओबामा अमेरिकेचे पहिले असे राष्ट्राध्यक्ष आहे ज्यांच्या शासनकाळात देशाचा आर्थिक विकास दर हा मागिल तीन वर्षात ३ टक्क्यांपेक्षा अधिक नव्हता. मला सांगितलं गेलं की मोठा देश असल्यामुळे विकास दर कमी प्रमाण्यात वाढला आहे. पण भारत देखील एक मोठा देश आहे. भारत ८ टक्के विकास दराने वाढत आहे.
ट्रंपने रॅलीमध्ये उपस्थित लोकांना विचारलं की, जर भारत इतक्या चांगल्या गतीने पुढे जात असेल तर मग अमेरिका का नाही. चीनही ६ ते ७ टक्के विकास दराने प्रगती करत आहे.