व्हिडिओ : हिजाब घातलेल्या महिलेशी गैरवर्तवणूक सोशल मीडियावर व्हायरल

डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहूल देशांतील नागरिकांना वीजा देण्यावर बंदी आल्यानंतर अमेरिकेत अनेक प्रवाशांना टार्गेट केल्याच्या घटना समोर येत आहेत. 

Updated: Feb 2, 2017, 03:31 PM IST
व्हिडिओ : हिजाब घातलेल्या महिलेशी गैरवर्तवणूक सोशल मीडियावर व्हायरल title=

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहूल देशांतील नागरिकांना वीजा देण्यावर बंदी आल्यानंतर अमेरिकेत अनेक प्रवाशांना टार्गेट केल्याच्या घटना समोर येत आहेत. 

मुस्लिम महिलांनाही या घटनांना सामोरं जावं लागतंय. त्यांना विनाकारण छळाला आणि अपमानजनक प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय. एका मुस्लिम महिलेनं आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा व्हिडिओच सोशल वेबसाईटवर जाहीर केलाय. 

39 वर्षांच्या असमा अलबूनी या महिलेनं हा व्हिडिओ शेअर केलाय. जोएज कॉफी शॉपमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असलेल्या या महिलेची परवानगी न घेता तिचे फोटो काढू लागला. या व्यक्तीला तिनं हटकलं आणि नंतर आपल्या मोबाईलवर तिनं या व्यक्तीचा व्हिडिओ शूट केला. 

यावर रागावलेल्या त्या व्यक्तीनं असमाशी उद्धटपणे वागत तिच्यासाठी अपशब्द सुरू केले. 'तुझ्याकडे ग्रीन कार्ड आहे का?' असंदेखील त्यानं तिला विचारलं. 

असमानं हा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केलाय....त्यानंतर तो व्हायरल झालाय.