ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा फोन मध्येच केला कट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी परदेशातील नेत्यांशी बातचित सुरु केली आहे. त्यांनी नुकताच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांच्यासोबत चर्चा केली. पण ही चर्चा आता चर्चेत आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी बोलतांना त्यांनी त्यांचा फोन अचानक कट केला. एक तास चालणारी चर्चा फक्त २५ मिनिटात संपली.

Updated: Feb 2, 2017, 03:01 PM IST
ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा फोन मध्येच केला कट title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी परदेशातील नेत्यांशी बातचित सुरु केली आहे. त्यांनी नुकताच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांच्यासोबत चर्चा केली. पण ही चर्चा आता चर्चेत आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी बोलतांना त्यांनी त्यांचा फोन अचानक कट केला. एक तास चालणारी चर्चा फक्त २५ मिनिटात संपली.

ट्रम्प यांनी म्हटलं की जगातील अनेक नेत्यांशी बोललो पण सगळ्यात घाण चर्चा तुमच्यासोबत झाली. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आधीपासून चांगले संबंध आहे पण या घटनेनंतर यावर काय परिणाम होतात हे पाहावं लागेल.

वॉशिंगटन पोस्टच्या बातमीनुसार ट्रम्प आणि टर्नबुल यांच्यात रिफ्यूजी डील संबधित चर्चा सुरु होती. ऑस्ट्रेलियातील एका डिटेंशन सेंटरमध्ये राहणाऱ्या 1,250 रिफ्यूजींना यूएसला जायचं होतं. हा मुद्दा त्यांनी चर्चत काढल्यानंतर ट्रम्प यांनी फोन ठेवून दिला.