बांग्लादेशमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यानं घेतली होती श्रद्धा कपूरची भेट

बांग्लादेशची राजधानी ढाकामधल्या एका रेस्टॉरंटमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 20 ओलिसांची हत्या करण्यात आली.

Updated: Jul 3, 2016, 08:14 PM IST
बांग्लादेशमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यानं घेतली होती श्रद्धा कपूरची भेट  title=

ढाका : बांग्लादेशची राजधानी ढाकामधल्या एका रेस्टॉरंटमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 20 ओलिसांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. हल्ला करणाऱ्यांमधला एक दहशतवादी असलेला निबारस खान बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरलाही भेटला आहे. निबारसनं त्याच्या फेसबूक प्रोफाईलवर श्रद्धा कपूरबरोबरचा फोटो ठेवला आहे. 'श्रद्धा कपूर यू ब्यूटी' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. 

ढाक्क्यामध्ये झालेल्या या हल्ल्याबाबात बांग्लादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी दहशतवाद्यांबाबत माहिती दिली आहे. हे सगळे दहशतवादी उच्च शिक्षित आणि श्रीमंत आहेत, दहशतवादी बनणं हल्ली फॅशन झाल्याचं ते म्हणाले. कोणीही मदरशामध्ये गेलेले नव्हते असं खान म्हणाले आहेत. दहशतवादी संघटना आयसिसनं याआधीच या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

या रेस्टॉरंटमध्ये हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओळखलं आहे. एकाचं नाव निबारस इस्लाम आहे. निबारस ढाक्याच्या मोनाश यूनिव्हर्सिटी इन मलेशियामध्ये शिकला आहे. इतर दोन दहशतवादी ढाक्क्याच्या स्कोलास्टिका स्कूलमध्ये शिकलेले आहेत.