ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार

ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार झाला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील कॅफेत त्याने दहशतवादी हल्ला केला होता. ढाका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान झालेल्या चकमकीत मास्टरमाईंड नुरूल इस्लाम मरजान हा दहशतवादी आणि त्याचा एक सहकारी ठार झाला.

PTI | Updated: Jan 6, 2017, 04:34 PM IST
ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार title=

ढाका : ढाका हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार झाला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील कॅफेत त्याने दहशतवादी हल्ला केला होता. ढाका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान झालेल्या चकमकीत मास्टरमाईंड नुरूल इस्लाम मरजान हा दहशतवादी आणि त्याचा एक सहकारी ठार झाला.

 रेअर बाजारात पोलीस आणि दशहतवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. परंतु नुरूल इस्लाम मरजानचा मृत्यू हा पोलिसांच्या गोळीमुळे झाली की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चकमकीनंतर राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आला.

गुलशन या आलिशान कॅफेवर १ जुलै रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय तरुणी आणि १६ परदेशी नागरिकांसह २२ जणांचा मृत्यू झाला होता. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.