नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.
शाह यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या हिलेरी क्लिंटन यांच्या विरोधातील अभियानात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
प्रेसीडेन्शियल ट्रान्जीशन टीमच्या घोषणेनुसार शाह यांची राष्ट्राध्यक्षांचे
उपसंचार सहाय्यक आणि संशोधन संचालकाचे उप सहाय्यक म्हणून नेमणूक केली आहे.