पाकिस्तानात लोकशाहीने बनविला इतिहास

लोकशाहीने निवडण्यात आलेल्या सरकारने पहिल्यांदा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा इतिहास रचला आहे. २००८ मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या नेतृत्वाखाली सरकार बनविण्यात आलं होतं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 18, 2013, 03:01 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
लोकशाहीने निवडण्यात आलेल्या सरकारने पहिल्यांदा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा इतिहास रचला आहे. २००८ मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या नेतृत्वाखाली सरकार बनविण्यात आलं होतं. यापूर्वी पाकिस्तानमध्ये सत्तेवर आलेल्या लोकशाही सरकारांना लष्करी ताकदीं किंवा इतर राजकीय बदलांमुळे हटविण्यात आल्याचा इतिहास आहे.
दरम्यान, या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हंगामी पंतप्रधान निवडण्यावरून पाकिस्तानमध्ये राजकारण सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणत्याही नावावर एकमत झाले नाही. पाकिस्तानच्या खालच्या सभागृहाने राष्ट्रीय संसदेत शनिवारी पाच वर्ष पूर्ण केले आहे.
शनिवारी रात्री पंतप्रधान रझा अशरफ यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केल्यावर हे सरकार भंग करण्यात आले. यावेळी अशरफ यांनी आपल्या भाषणात सर्व लोकशाही संस्थांचे आणि शक्तींचे आभार मानले. तसेच लोकशाही मजबूत केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.