बोद्रुम (तुर्की) : तर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर ३ वर्षीय सीरियन मुलाचा मृतदेह वाहून आला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी केलेल्या खुलाशाने काळीज हेलावलेय. माझ्या हातातून मुलगा सटकला. ही घटना घडली त्यावेळी आम्ही नौकेतून यूनानला जात होतो. लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जगाला हादरा बसला.
अब्दुल्लाने आपल्या तीन वर्षीय मुलगा आयलान, चार वर्षीय मुलगा घालेब आणि पत्नी रिहाना यांनाही गमावल्याची शोकांतिका पुढे आलेय. तुर्की मीडियाने अब्दुला सीरियनचे टोपन नाव कुर्दी ठेवले. अब्दुलाने तुर्कीतील डोगान समाचार एजेन्सीला सांगितले की, नौका बुडत होती. ही बाब मी माझ्या पत्नीला सांगितली. मी पत्नीचा हात पकडला होता. मात्र, माझ्या हातातून मुलाचा हात सुटला आणि तो पडला. त्यावेळी अंधार होता. त्यावेळी काळोखात ओरडण्याचा, आक्रोशाचा आवाज येत होता. त्याने छोट्या नौकेला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोराचा वारा असल्याने त्याचा प्रयत्न असफल झाला.
एका परदेशी फोटोग्राफरने सांगितले की, अब्दुला बोद्रुमच्या शवगृहाजवळ एकदम निराश आणि हाताश अवस्थेत बसला होता. तो आपल्या कुटुंबाचे शव गाडीत ठेवण्याची वाट पाहत होता. त्याचे लक्ष सातत्याने फोनवर होते. बुधवारी नौका दुर्घटना घडली. यावेळी १२ सीरियन प्रवासी बुडाले होते. यात ३ वर्षीय आयलानचा मृत्यू हृदयाला चटका लावून गेला. त्याने जगाचे लक्ष वेधले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.