मुंबई हल्ल्याचा आरोपी हेडली याला ३५ वर्षांचा तुरुंगवास

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा पडद्यामागचा सूत्रधार आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या शिकागो कोर्टानं हेडलीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 24, 2013, 11:41 PM IST

www.24taas.com, शिकागो
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा पडद्यामागचा सूत्रधार आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या शिकागो कोर्टानं हेडलीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट हेडलीनेच रचला होता. हल्ल्यापूर्वी हेडलीनं मुंबईची रेकी केली होती. अमेरिकेत जन्मलेला हेडली केवळ लष्कर ए. तोयबाच नाही तर अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी अनेक वर्षांपासून काम करत होता.
‘हेडली यानं केलेला अपराध हा केवळ निंदनीयच आहे. पण त्याचा या गुन्ह्यातील सहभागासाठी त्याला ठोठावली जाणारी शिक्षाही तितकीच महत्त्वाची ठरेल कारण, त्यानं दहशतवादाशी लढण्यासाठी अमेरिका सरकारची मदतदेखील केलीय’ असं अॅटर्नी जनरल गॅरी एस. शप्रियो यांनी सरकारनं केलेल्या मागणीचं स्पष्टीकरण दिलंय.
अमेरिकेनं हेडलीसाठी ३०-३५ वर्षांच्या शिक्षेची मागणी केलीय, जी त्याप्रमाणात तहव्वुर हुसैन राणा प्रकरणात ठोठावण्यात आलेल्या शिक्षेपेक्षा कमीच आहे. लष्कर ए तोयबाच्या मदत करण्याच्या आरोपावरून राणा याला दोषी ठरवत १४ वर्षांची सजा सुनावण्यात आलीय तसंच त्यानंतर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पुढचे पाच वर्ष त्याला नजरकैदेत ठेवलं जाणार आहे.