फेसबुकवर हनीमूनचे फोटो टाकणं महिलेला पडलं महाग

पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकणं इटलीतील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. इटलीतील कोर्टानं महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले असून यासाठी महिलेनं पतीला आर्थिक नुकसान भरपाई देखील द्यावी, असं कोर्टानं म्हटलंय. 

IANS | Updated: Aug 18, 2014, 01:51 PM IST
फेसबुकवर हनीमूनचे फोटो टाकणं महिलेला पडलं महाग title=

नॅपल्स, इटली: पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकणं इटलीतील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. इटलीतील कोर्टानं महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले असून यासाठी महिलेनं पतीला आर्थिक नुकसान भरपाई देखील द्यावी, असं कोर्टानं म्हटलंय. 

इटलीतील नॅपल्स इथं राहणाऱ्या महिलेनं हनीमूनचे फोटो तिच्या फेसबुक अकाऊंटवर टाकले होते. दहा वर्षांपूर्वी काढलेल्या या फोटोमध्ये दोघंही एकमेकांना मिठी मारताना आणि चूंबन देताना दिसत होते. हा प्रकार महिलेच्या पतीला रुचला नाही आणि त्यानं पत्नीविरोधात थेट कोर्टात धाव घेतली. 

पत्नीनं खासगी आयुष्यातील फोटो सार्वजनिक करुन इटलीतील 'राईट टू प्रायव्हसी' या मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्याचं पतीचं म्हणणं होतं. तर फेसबुक हे आधुनिक तंत्रज्ञान असून त्यावर फोटो टाकणं गैर नाही असं महिलेचं म्हणणं होतं. 

नॅपल्समधील कोर्टानं पतीच्या वकिलानं केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत महिलेला हनीमूनचे फोटो फेसबुकवरुन काढून टाकण्याचे आदेश दिले. तसंच महिलेनं तिच्या पतीला आर्थिक नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.