बिजिंग : चीनची 24 वर्षीय पेरेन्ना होई टिंग ही जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती' तरुणी ठरलीय. होईच्या नावावर सध्या 1.3 अब्ज डॉलर संपत्ती आहे.
पेरेन्ना होई टिंग हीनं फेसबूकचा संस्थापक डस्टिन मोस्कोवित्ज याचं स्थान घेतलंय.
चीनच्या सरकारी न्यूज सर्व्हिसनं दिलेल्या बातमीनुसार, चीनच्या रिअल इस्टेट डेव्हलपर लोगान प्रॉपर्टीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जी हॅपेंग यांची मुलगी पेरेन्ना होई टिंग कंपनीची गैर कार्यकारी संचालक आहे. तसंच 1.3 डॉलर संपत्तीसोबतच कंपनीत तिची 85 टक्के भागीदारीही आहे.
पेरेन्ना होई टिंग हिनं लंडन विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त केलीय. ती सध्या हाँगकाँगमध्ये राहते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.