ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ जणांकडून बलात्कार

दिल्लीच्या निर्भया प्रकरणाप्रमाणेच ब्राझीलच्या रिओ शहरात एक धक्कादायक घटना घडलीये. १६ वर्षाच्या एका मुलीवर ३३ लोकांनी बलात्काराच्या घटनेने रिओ शहरात एकच खळबळ उडालीये. 

Updated: May 28, 2016, 09:42 AM IST
ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ जणांकडून बलात्कार title=

साओ पावलो : दिल्लीच्या निर्भया प्रकरणाप्रमाणेच ब्राझीलच्या रिओ शहरात एक धक्कादायक घटना घडलीये. १६ वर्षाच्या एका मुलीवर ३३ लोकांनी बलात्काराच्या घटनेने रिओ शहरात एकच खळबळ उडालीये. 

गेल्या शुक्रवारी पिडीत मुलगी शहरातील पश्चिम भागात राहणाऱ्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली होती. रविवार सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा अनेकांनी तिला घेरले होते. यातील अनेकांच्या हातात पिस्तुल तसेच रायफल्स होती. या ३३ नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. 

या भीषण घटनेनंतर पीडितेला जबर मानसिक धक्का बसलाय. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलीये. त्यापूर्वी ही भयंकर घटना घडलीये.