www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनचे जगातील मोठे लष्कऱ म्हणून ओळखले जाते. आता चीनने त्यापुढे एक पाऊल टाकून "वानर सेना" तयार करीत आहे. चीनच्या हवाई दलात आता "वानर सेना" दिसणार आहे.
चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए)ने येथील जवळच्या हवाईदर स्टेशनच्या सुरक्षितेसाठी वानरांना प्रशिक्षण दिले आहे. हे वानर विमानाला धोकादायक असणाऱ्या पक्षांना हटवण्याचे काम करणार आहेत. हवाई दल प्रवक्त्याच्याच्या माहितीनुसार, वानरांना पक्षी हटविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. झाडावरील पक्षांना हे वानर बंदुकीच्या सहाय्याने पळवून लावतील. त्यामुळे या पक्षांचा विमान अपघाताला धोका पोहोचणार नाही.
दरम्यान, यानंतर चीनचे लष्कर वानरांना आपल्या सेवेत दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीन आपल्या शत्रूंवर वानर सेना लक्ष्य ठेवील. सध्या पक्षी हटविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे, असे चीनच्या हवाई दल स्टेशन प्रवक्त्याने स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.