चीनचे अतिक्रमण, लडाखला मुकावे लागेल?

चीनी सैन्याच्या लडाखमधल्या अतिक्रमणामुळे तब्बल ७५० चौरस किलोमीटर जमीनीला मुकावं लागणार आहे. चीनची घुसखोरी हा स्थानिक मुद्दा असल्याचा पंतप्रधानांचा दावा फसवा असल्याचं स्पष्ट झालंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2013, 07:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
चीनी सैन्याच्या लडाखमधल्या अतिक्रमणामुळे तब्बल ७५० चौरस किलोमीटर जमीनीला मुकावं लागणार आहे. चीनची घुसखोरी हा स्थानिक मुद्दा असल्याचा पंतप्रधानांचा दावा फसवा असल्याचं स्पष्ट झालंय.
केवळ १९ किलोमीटर क्षेत्रातच चीन आहे, असं सांगून सरकारनं प्रकरणाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतंय. मात्र लष्कर प्रमुखांनी कॅबिनेट सुरक्षा समितीला दिलेली माहिती धक्कादायक आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबत वृत्त दिलंय. यामुळे तब्बल ७५० चौरस किलोमीटर म्हणजेच अंदाजे १ लाख ८५ हजार ३२९ एकर भारतीय भूभाग ड्रॅगनच्या घशात जाण्याची भीती आहे.
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे घुसखोरी केलेल्या राकी नाला भागात चीननं पक्का रस्ता बांधायलाही सुरूवात केलीये. भारतीय लष्कराच्या स्पाय ड्रोन्सनं घेतलेल्या छायाचित्रांमधून ही माहिती उघड झालीये. तरीही केंद्र सरकार सुस्तच का आहे, असा प्रश्न आहे.