नवी दिल्ली : भारतीय रेल्वे, भारतीय उत्पादनं आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चीनकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जातेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीयल पार्कमध्ये गुंतवणुकीचा निर्णय जिनपिंग घेणार आहेत. जपाननं भारतात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर चीन किती गुंतवणूक करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारत चीन सीमेवर मैत्रीपूर्ण संबंध दिसत नसले तरी भारतात चीनचे राष्ट्रपतींच्या दौ-यापासून ब-याच आशा आहेत. भारताचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट चीन पूर्ण करणार आहे.. ही दोन्ही देशांसाठी वीन-विन स्विच्युएशन आहे.
चीनला रोजगार हवाय आणि भारताला गुंतवणूक. भारत-चीनच्या नात्यात गुंतवणुकीचा गोडवा दिसणार आहे. चीनचे राष्ट्रपती घेऊन आले आहे विकासाची गिफ्ट. पुणे आणि गुजरातमध्ये इंडस्ट्रीयल पार्क उभे करण्यासाठी गुंतवणूक करणार आहे. त्याबाबत चीनने हिरवा कंदील दाखवला आहे.
सीमेवर भारत आणि चीनचे संबंध खराब असले तरी पुढील 5 वर्षांत चीन भारतात 100 बिलियन डॉलर्स म्हणजेच 6 लाख कोटींची गुंतवणूक करुन दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करु पाहतोय. चीनची भारतातील गुंतवणूक जपानच्या 35 बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीहून तीन पट अधिक आहे.
चीनच्या वाणिज्य दुतावासाच्या माहितीनुसार चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्या दौ-यादरम्यान चीन भारतात इंडस्ट्रीयल पार्क, रेल्वेचं आधुनिकीकरण, हायवे, बंदर, वीज उत्पादन, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, फूड प्रोसेसिंग आणि टेक्सटाइल इंडस्ट्रीजसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करणारेय.
चीन सुरुवातीला पुणे आणि गांधीनगर इंडस्ट्रीयल पार्कमध्ये 7 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं चीनच्या वाणिज्य दुतावासाकडून आलेल्या माहितीवरून समजतंय. पुण्याचं इंडस्ट्रीयल पार्क ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी असेल. यातून जवळपास 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकले. गुजरातचं इंडस्ट्रीयल पार्क वीज उपकरणांच्या उत्पादनासाठी असणारेय. त्याचबरोबर तामिळनाडूमध्येही चीन टेक्सटाईल आणि फूड प्रोसेसिंगसाठी इंडस्ट्रीयल पार्क बनवण्याच्या दिशेनं काम करतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौ-यामध्ये सर्वाधिक चर्चा बुलेट ट्रेनवरून झाली. आता चीनही या दिशेनं पुढे जाऊ पाहतोय. भारतीय रेल्वेला चमकवणार आहे चीन. इंडस्ट्रीयल पार्कसहित चीनची नजर भारताच्या रेल्वे क्षेत्रावरही आहे. चीन भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण, बुलेट आणि हायस्पीड ट्रेन चालवण्यासाठी 50 बिलियन डॉलरहून अधिक गुंतवणूक करणारेय. चीन भारतातील प्रमुख शहरं 160 किलोमीटर प्रति तास हायस्पीड ट्रेननं जोडण्याची इच्छा चीनच्या वाणिज्य दुतावासानं व्यक्त केलीय. सोबतच देशातील रेल्वे आधुनिकीकरणाशी संबंधित अन्य प्रकल्पांमध्ये चीनची गुंतवणूक करण्याची इच्छा आहे.
चीनी सरकारसोबतच तिथलं व्यापारी समूहही भारत यात्रेकडे आशेनं बघतायत. राष्ट्रपती जिनपिंग यांच्या भारत दौ-यादरम्यान 20 हून अधिक चायनीज कंपन्या भारतीय कंपन्यांसह करार करणारेत. त्याअंतर्गत चीनी कंपन्या भारताकडून जवळपास 650 मिलियन डॉलर किंमतीच्या कॉपर, कैथोड, सी फूड, खाद्यतेल आणि रेशमी धागे आयात करतील. त्यामुळे आता लक्ष लागलंय ते चीनचे राष्ट्रपती यांच्या भारत दौ-याकडे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.