आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

Updated: Jun 7, 2016, 03:58 PM IST
आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात title=

बिजिंग : चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यात १६४ जणांनी आपला जीव गमावला होता. तर ३०८ जण जखमी झाले होते. चीनचं स्टेट टेलिव्हिजन चॅनल सीसीटीव्ही-९ नं नुकतीच एक डॉक्युमेंट्री प्रसारित केली होती. यामध्ये लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानच्या समर्थकांबद्दल सांगण्यात आलंय. 

परकीय धोरणात बदल

यामुळेच, चीन आपल्या आंतरराष्ट्रीय नीतीत बदल करत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. नुकतंच, भारतानं संयुक्त राष्ट्रात जौश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी केलीय. नेहमी पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या चीननं या प्रस्तावाला खो घातला होता. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला टीकेचा सामना करावा लागला होता.