रोम : चीनी कंपन्या काय काय बनावट वस्तू तयार करतील याचं काहीही सांगता येणार नाही, प्लास्टिक तांदूळनंतर चीनने आता, बनावट कंडोमचा पुरवठा केला आहे, यात इटली आणि भारत या दोन देशांमध्ये हा पुरवठा झाला आहे.
चीनी बनावटीचे हे कंडोम बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रोमच्या लिओनार्दो दा विंची विमानतळावरुन तब्बल सहा लाख बनावट कंडोम जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ही बाब स्पष्ट होत आहे.
चीनमधील एका साईटने या कंडोमची खरेदी करण्यात आली होती, चीन दरवर्षी १०० कोटीच्या आसपास कंडोम्सची निर्मिती करतो, ही संख्या जगाच्या एकूण उत्पादनापैकी २५ टक्के आहे.
साधारणत: संसर्गजन्य लैंगिक रोगाचा प्रसार न होण्यासाठी कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, मात्र बनावट कंडोम कसा ओळखायचा हे अजून कुणालाही समजू शकलेलं नाही, यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.