वॉशिंग्टन : जर तुम्हाला कोणी सांगितले की एका झाडाला ४० वेगवेगळ्या प्रकाराची फळे लागतात, तर तुमचा विश्वास नाही ना बसणार, पण हो हे खरे आहे.
अमेरिकेतील सेराक्यूज युनिवर्सिटीमधले विज्युवल आर्टसचे प्रोफेसर वैन अॅकेन यांनी या झाडाची निर्मिती केली आहे. या झाडाचे नाव 'ट्री ऑफ ४०' असे असून त्याला तब्बल ४० निरनिराळ्या प्रकारची फळे येतात.
या फळांमध्ये जर्दाळू, पीच, चेरी, आलबुखार यासारख्या प्रकारांचा समावेश आहे. फळे तसेच भाज्यांच्या उत्पादनाला घेऊन असलेले पारंपारिक विचार बदलण्याच्या हेतूने 'ट्री ऑफ ४०' या झाडाची निर्मिती केली आहे असे वैन अॅ्केन यांनी सांगितले आहे.
'ट्री ऑफ ४०' या प्रकल्पावर २००८ पासून काम सुरू झाले होते. यासाठी अॅकेन यांनी न्यूयॉर्कमधील स्टेट अॅग्रिकल्चरल एक्सपेरिमेंटमध्ये एक बगीचा पाहिला.
ज्या बगीच्यात २०० निरनिराळ्या प्रकारची आलबुखार आणि पीच यांची झाडे होती. त्यांनी या बगिच्याला भाडेतत्वावर घेऊन ग्राफ्टिंगच्या मदतीने 'ट्री ऑफ ४०' या प्रकल्पाला पूर्णत्वास नेले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.