बीजिंग: चीनच्या होहोट प्रांतात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. आई कामात व्यस्त असताना वर्षभराची चिमुरडी वॉशिंग-मशीनजीक खेळत होती. त्यावेळी खेळता-खेळता या मुलीचा पाय वॉशिंग-मशीनच्या ड्रायर ट्यूबमध्ये अडकून पडला.
सारा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला ट्यूबमधून बाहेर काढण्याचे अतोनात प्रय़त्न केले. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.
अखेर बचावदलाला पाचारण केल्यानंतर गॅस कटरच्या सहाय्यानं ही ड्रायर ट्यूब कापण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या या प्रय़त्नानंतर अखेर या मुलीची सुखरुप सुटका झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.