मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन

इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं भारतात परतण्याची इच्छा दर्शवली. पण त्यानं सरेंडर केलं नसल्याचंही त्यानं कबुल केलं.

Updated: Oct 29, 2015, 10:29 AM IST
मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन  title=

बाली: इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं भारतात परतण्याची इच्छा दर्शवली. पण त्यानं सरेंडर केलं नसल्याचंही त्यानं कबुल केलं.

बाली पोलिसांनी राजनला अटक केल्यानंतर अशी बातमी आली होती की, त्याला देशात परतायचं नाही. इंडोनेशियन पोलिसांना त्यानं झिम्बाव्वेला पाठविण्याची विनंती केल्याची चर्चा होती. पण छोटा राजननं हे सगळं खोटं असल्याचं सांगितलंय.

दोन वर्षांपूर्वी झाली बायपास सर्जरी

छोटा राजननं तिथल्या डॉक्टरांना हे सांगितलंय दोन वर्षांपूर्वी त्याची बायपास सर्जरी झाली होती. अटक करण्यात आल्यानंतर राजनजवळ कोलेस्ट्रॉलच्या औषधांची कमतरता होती म्हणून त्याची मेडिकल चाचणी करण्यात आली. डॉक्टरांनी मग हॉस्पिटलमध्ये त्याला औषधं दिलीत. छोटा राजनला किडनी संबंधी आजार आहे आणि आता त्याला हृदयाचा आजारही झालाय.

आणखी वाचा - छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

दुसरीकडे भारतीय अधिकारी इंटरपोलच्या सतत संपर्कात आहे. अधिकाऱ्यांना विदेश मंत्रालयाच्या आदेशाची वाट आहे म्हणजे ते मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांसह बाली रवाना होतील.

सरकारची पहिलेपासूनच तयारी

भारत सरकारनं छोटा राजनला देशात आणण्याची तयारी सुरू केलीय. यासाठी केंद्रानं मुंबई पोलिसांकडून डॉनवर डोजियर मागितलंय. त्याला भारतात आणण्याच्या कारवाईला २० दिवसांहून अधिक काळ लागू शकतो.

क्राइम ब्रांचचे डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं छोटा राजनविरोधात जवळपास ७० केसेस आहेत. मुंबई पोलीस लवकरच सर्व माहिती केंद्र सरकारकडे सोपवेल. 

आणखी वाचा - जाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.