www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
पाकिस्तानात नरमांसभक्षण करणाऱ्या दोन भावंडांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका महिलेचं प्रेत खाताना रंगेहात पककडण्यात आलं होतं. या महिलेचं प्रेत त्यांनी दफनभूमीतून काढलं होतं. मात्र या बद्दल न्यायालयाने त्यांना केवळ २ वर्षांची तुरुंगावासाची शिक्षा दिली.
२४ वर्षीय सायरा परवीन हिचा मृत्यू गळ्याच्या कँसरने झाला होता. तिला दफन केल्यावर दुसऱ्याच दिवशी तिचं शव उकरून काढलं गेल्याचं लक्षात आलं. हे शव कुठे गेलं, याचा शोध घेत असताना मोहम्मद फरमान अली आणि मोहम्मद अरिप अली या दोन बंधूंच्या घरात धक्कादायक पुरावे सापडले. एका खोलीमध्ये पातेल्यात त्यांनी सायराची मांडी आणि पोटरी शिजवलेली होती. उर्वरीत प्रेत तिथेच गोणपाटात लपवलेलं होतं.
पाकिस्तानात नरभक्षणाविरोधी कुठलाही कायदा नाही. तसंच दोघांनी कुणाचीही हत्या केली नव्हती. त्यामुळे या दोघांना प्रेताची विटंबना केल्याबद्दल केवळ २ वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिकाने त्यांना मानवी मांस खाण्यास सांगितल्याचं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे, तर काही जणांच्या मते ते विकृत आहेत.
यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा प्रेतं खाल्ली होती. मात्र यापुढे असे प्रकार न करण्याची शपथ घेत दोघेही बंधू घर सोडून निघून गेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.