www.24taas.com, लंडन
ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सुमारे शनिवार -रविवार या दोन दिवसात ९० जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचं वय अवघं १६ वर्षं आहे. या बलात्कारांनी तिच्यावर प्रचंड मानसिक आघात केल्याचं खुद्द त्या मुलीने म्हटलं आहे. ही मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकवली गेली होती.
डेली एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार ही गरीब मुलगी गंभीर परिस्थितीत बलात्काऱ्यांच्या हाती लागली. यानंतर तिच्यावर वीकेण्डला बलात्कार होत राहिला. या आठवड्याभरात तिच्यावर ९० जणांनी बलात्कार केला. ब्रिटनमधील सेंटर फॉर सोशल जस्टिसने या घटनेकडे लक्ष देऊन मुलीला वाचवलं. ही मुलगी आता पूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ब्रिटनमध्ये लैंगिक शोषण आणि गुलामी व्यवस्थेविरोधात सेंटर फॉर सोशल जस्टिस कार्यरत आहे. या मुलीला जरी वाचवलं असलं, तरी अशा अनेक मुली अशा प्रकारच्या सेक्स रॅकेटमध्ये अडकल्याचं सेंटर फॉर सोशल जस्टिसचे सचिव इयान डुनाकन यांनी सांगितलं आहे. ब्रिटनमध्ये गेल्यावर्षी १००० मुलींवर अशी परिस्थिती ओढावल्याचा अहवाल आहे. अशा मुलींना बहुतेकवेळा वेश्यावृत्ती, गुन्हेगारी आणि घरकामासाठी प्रवृत्त केलं जातं.