www.24taas.com, व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकन सिटीमध्ये आज नव्या पोप निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. पोपच्या निवडणुकीसाठी ११५ कार्डिनल व्हेटिकन सिटीमध्ये दाखल झाले आहेत. आणि यातीलच एक जण पोप पदासाठी पात्र ठरणार आहे.
नव्या पोप पदासाठी यावेळेस असणाऱ्या उमेदवारांमध्ये चुरसीची लढत होणार आहे. कारण की, अशी मागणी होत आहे की, नवीन पोप हे आफ्रिका किंवा आशिया खंडातून असावेत. नव्या पोप पदासाठी होणाऱ्या निवडणुकीची माहिती देण्यासाठी व्हॅटिकन सिटीच्या सिस्टीन चॅपलच्या छतावर एक चिमणी लावण्यात आली आहे. या चिमणीतून जेव्हा सफेद धूर निघू लागेल तेव्हा नागरिकांना समजेल की, नवे पोप निवडण्यात आले आहेत.
८५ वर्षाचे पोप बेनेडिक्ट सोळावे ह्यांनी मागील महिन्यात आपल्या ढासळत्या प्रकृतीमुळे पोप पदाचा राजीनामा दिला. मागील सहाशे वर्षातील ते पहिले पोप आहेत की ज्यांनी आपल्या ह्या पदाचा राजीनामा दिला आहे.