महिलेला अंतराळातून आला फोन विचारले, हॅलो ही पृथ्वी आहे का?

जर तुम्हाला कोणाचा कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विचारले की हॅलो तुम्ही पृथ्वीवरुन बोलताय का? तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. 

Updated: Dec 26, 2015, 10:09 AM IST
महिलेला अंतराळातून आला फोन विचारले, हॅलो ही पृथ्वी आहे का? title=

ब्रिटन : जर तुम्हाला कोणाचा कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विचारले की हॅलो तुम्ही पृथ्वीवरुन बोलताय का? तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. तुम्ही म्हणाला असा प्रश्न कोणी विचारेल का? मात्र हो हे खरे आहे. एका महिलेला असाच फोन आला तिने फोन उचलल्यानंतर समोरच्या व्यक्तीने हॅलो ही पृथ्वी आहे का? असे विचारले. या प्रश्नाने मात्र ती महिला पुरती गोंधळून गेली. 

ब्रिटनमधील अंतराळ टीममधील पिएकी यांनी एका चाचणीसाठी हा प्रयोग केला होता. ते नेहमीप्रमाणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे कार्यरत होते. तेथून त्यांनी एका नंबर डायल केला आणि ही पृथ्वी आहे का असे विचारले. या प्रश्नाने मात्र समोरची महिला चक्रावूनच गेली. दुसऱ्या ग्रहावरुन फोन आला की काय असे त्या महिलेला वाटले. 

दरम्यान, या घटनेनंतर पिएकी यांनी फेसबुकवरुन त्या महिलेला तसदी दिल्याबद्दल माफी मागितली. हा काही प्रँक कॉल नव्हता, असे त्यांनी फेसबुक पेजवर म्हटलेय. पिएकी यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीय.