लंडनच्या महाराणीचीही स्वच्छता मोहीम, च्युईंगम काढण्यासाठी देणार १६ हजार पाऊंड

ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना एका सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे... या कर्मचाऱ्याची केवळ एकच जबाबदारी असेल... आणि ती म्हणजे एलिजाबेथबाईंच्या महालात इकडे-तिकडे पसरलेले, थुंकलेले च्युईंगम काढण्याची... 

Updated: Oct 2, 2014, 11:46 AM IST
लंडनच्या महाराणीचीही स्वच्छता मोहीम, च्युईंगम काढण्यासाठी देणार १६ हजार पाऊंड title=

लंडन : ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना एका सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे... या कर्मचाऱ्याची केवळ एकच जबाबदारी असेल... आणि ती म्हणजे एलिजाबेथबाईंच्या महालात इकडे-तिकडे पसरलेले, थुंकलेले च्युईंगम काढण्याची... 

या कामासाठी ब्रिटनची महाराणी वार्षिक १६ हजार पाऊंड म्हणजेच जवळपास १६ लाख रुपये पगार म्हणून देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा जॉबही पार्ट टाईम असणार आहे. 

प्रत्येक आठवड्यातून पाच दिवस दररोज केवळ चार तास महालात ठिकठिकाणी पसरलेले च्युईंगम या सफाई कर्मचाऱ्याला काढावी लागणार आहेत. 

ब्रिटनचं शाही कुटुंब सद्या महालाला भेट देणाऱ्या पाहुण्यांमुळे सध्या त्रस्त आहे. एडनबर्ग स्थॉत होलीरुड हाऊसमध्ये येणारे व्हिजिटर्स येता-जाता च्युईंगम खाऊन कुठेही थुंकताना दिसतात. त्याचमुळे, राणीकडे या जॉबसाठी संधी निर्माण झालीय. 

नोकरीसाठी पात्रता...
* नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं वजन कमी असायला हवं.
* उमेदवार हा ब्रिटनचा नागरिक असणं आवश्यक आहे. 
* त्याला महालात फ्लोअरवर आणि फर्नीचर पडलेले च्युईंगम शोधून खरडून काढावे लागतील. 
* याशिवाय महाराणी महालात असतील तेव्हा पायऱ्यांची सफाई करावी लागले आणि भांडीही घासावी लागतील.
* त्याला साफ-सफाईची माहिती असायला हवी.
* आपल्या कामाचा आनंद आणि गर्व त्याला असायला हवा.

अशा अटी शाही कुटुंबाच्या वेबसाईटवर जाहीर केलेल्या जाहीरातीत स्पष्ट करण्यात आल्यात.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.