विचित्र...! इंडोनेशियात आहे 'सेक्स माउंटेन'

जग प्रत्यक्षात खूप चित्र-विचित्र आहे. एक खळबळजनक खुलाशात एसबीएस डेटलाइनच्या पत्रकाराने इंडोनेशियाच्या ‘सेक्स माऊंटेन’वर जाण्याची परवानगी मिळवली आहे. हे तुम्हांला विचित्र वाटेल पण खरं म्हणजे वास्तवात अशा नावाची जागा त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी पूर्वापार मोठ्या प्रमाणात व्यभिचार (सामुहिक यौन संबंध) आणि सेक्स (यौन क्रिया) होत आहेत. 

Updated: Nov 18, 2014, 09:38 PM IST
विचित्र...! इंडोनेशियात आहे 'सेक्स माउंटेन'  title=

नवी दिल्ली : जग प्रत्यक्षात खूप चित्र-विचित्र आहे. एक खळबळजनक खुलाशात एसबीएस डेटलाइनच्या पत्रकाराने इंडोनेशियाच्या ‘सेक्स माऊंटेन’वर जाण्याची परवानगी मिळवली आहे. हे तुम्हांला विचित्र वाटेल पण खरं म्हणजे वास्तवात अशा नावाची जागा त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी पूर्वापार मोठ्या प्रमाणात व्यभिचार (सामुहिक यौन संबंध) आणि सेक्स (यौन क्रिया) होत आहेत. 

मीडियातील रिपोर्टनुसार, या आंतरराष्ट्रीय पत्रकाराला अपवाद म्हणून ‘लँड ऑफ सेक्स’ ला भेट देण्याची परवानगी देण्यात आली. या ठिकाणी वेगवेगळ्या पेशाचे आणि विविध वैवाहिक स्थितीचे पुरूष आणि महिला या पारंपारिक क्रियेत भाग घेतात. 

इंडोनेशियात असे मानले जाते की, एखादा प्रवासी शिखरावर ही क्रिया करण्यासाठी जातो, त्यासाठी गुनंग केमुकुस पॉइंटवरून गेल्यास त्या प्रवाशाचे भाग्य फळफळते. बातमीनुसार, या क्रियेत प्रवाशाकडून अशी अपेक्षा असते की त्याची वैवाहिक स्थिती काहीही असेल पण त्यांनी सेक्समध्ये सामील व्हायला हवे. हे इस्लामिक कायद्यानुसार बिल्कुल विरोधाभासी आहे. 

या सर्व क्रियेबाबत एक दंतकथा अशी आहे, की एकदा इंडोनेशियाचा एक युवा राजाचे आपल्या सावत्र आईशी अफेअर होते. सेक्स दरम्यान त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना गुनुंग केमुकुस माउंटेनच्या टॉपवर त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यामुळे असे मानले जाते की या माउंटेनच्या टॉपवर जो कोणी सेक्स करतो. त्याचे भाग्य उजळून जाते. 

पण यासाठी एक अट आहे. रिपोर्टनुसार, सेक्स पार्टनर कोणत्याही परिस्थितीत पती-पत्नी असू नये. तसेच प्रवाशाकडून अपेक्षा असते की ते ३५ दिवस सहवास करू शकतात. याचा क्रम सातवेळा लगोपाठ व्हायला हवा. हा केवळ व्यभिचार आणि फ्रि सेक्सपर्यंत सीमित नाही. इंडोनेशियातील नागरिकांमध्ये या क्रियेच्यामागे धार्मिक बाजूही आहे. 

या ठिकाणी येणार प्रवासी श्राइनमध्ये आपली श्रद्धा व्यक्त करतात. या ठिकाणी प्रार्थना करण्यापूर्वी एका झऱ्याखाली स्नान करावे लागते. त्यानंतर लगेच पार्टनरचा शोध घेतला जातो. या ठिकाणा मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचा धोका आहे. पण तरी लोक चांगल्या भाग्यच्या धारणेसाठी या ठिकाणी पोहचतात... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.