व्हॅलेंटाईन डेसाठी सर्वात महागडा गुलाबांचा बुके

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याने विविध डे साजरे केले जातायत. यंदाच्या व्हॅलेंटाईनला तुम्ही तुमचा प्रियकर अथवा प्रेयसीला गुलाबाचा बुके देण्याचा विचार करताय तर ही बातमी वाचा. 

Updated: Feb 10, 2016, 08:13 AM IST
व्हॅलेंटाईन डेसाठी सर्वात महागडा गुलाबांचा बुके title=

ब्रिटन : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याने विविध डे साजरे केले जातायत. यंदाच्या व्हॅलेंटाईनला तुम्ही तुमचा प्रियकर अथवा प्रेयसीला गुलाबाचा बुके देण्याचा विचार करताय तर ही बातमी वाचा. 

जगातील सर्वात महाग असलेला हा गुलाबांचा बुके तब्बल नऊ लाख रुपयांचा आहे. इक्‍वेडोर येथील ही गुलाब आहेत. 

या बुकेमध्ये एक हजार गुलाब असून प्रत्येक गुलाब पाच फूट लांब आहे. १५० गुलांबांचा समावेश असलेला बुकेची किंमत दोन लाख रुपये, ५० गुलाबांच्या बुकेची किंमत ७५ हजार तर २४ गुलाबांच्या बुकेची किंमत ५० हजार रुपये आहे. एरीना कंपनी असे गुलाबांचे बुके विकते.